Friday, April 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

वर्ध्यात राष्ट्रवादीच्या नेत्याने मुलीचे केले लैंगिक शोषण; पुलगाव पोलिसांत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नरेंद्र देशमुख, मुख्य संपादक, वर्धा महाराष्ट्र दणका,नेटवर्क

वर्धा जिल्ह्यातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘जागतिक महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर समाजाला हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे. वर्ध्यात राष्ट्रवादीशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावर अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर गमे असे या आरोपीचे नाव असून पुलगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी १७ वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवत गेल्या सुमारे पाच वर्षांपासून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे.तसेच तीन दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा आरोप आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित मुलीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत ७ मार्चच्या सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आरोपी हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी संबंधित एका दिग्गज नेत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular