वर्धा : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची तहान भागविण्यासाठी वर्धा येथे ‘हिंदू ही पुढे प्याऊ’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वर्धा जंक्शन समोर, व्यास भवनजवळ शनिवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता हा उपक्रम सुरू करण्यात आला.
डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल व नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्याऊद्वारे रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी तसेच शास्त्री चौक ते बसस्थानक व भाजी मार्केटकडे जाणाऱ्या नागरिकांना २४ तास थंड आर.ओ. पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी परिसरातील दुकानदारांनी पुढाकार घेत पाण्याच्या कॅनचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जगदीश पाटीदार, अंकित ठाकूर, दिलीप चंदोरिया आदींचे यामध्ये विशेष योगदान आहे.
उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदच्या केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र-गोवा प्रभारी माला दीदी रावल उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनूप जायस्वाल, समाजसेवक प्रदीप बजाज, प्रदीप वानखेडे, मदन चावरे, हरीश व्यास, सतीश शर्मा, भरत आमले, साहिल परीयाल, संजय शर्मा, कपिल बैसवार, राजेश ठाकूर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे उष्णतेच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




